Homeताज्या बातम्या"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक...

“सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी”; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाप्रचंड विजय झाला. या विजयानंतर अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे, तर दुसरीकडे भाजपदेखील या पदावर दावा करत आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यामुळे ते मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, आता अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण भेटत आहोत. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नव्हता. जे काही अडीच वर्षात महायुतीने काम केले, लोकांनी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. ‘

मी मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन

‘पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता काम करतात, तसे मी कार्यकर्ता म्हणून काम केले. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि आजही करत आहे. मी स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही, कॉमन मॅन म्हणून काम केले. एकीकडे जी विकास कामे महाविकास आघाडीने थांबवली होती, ती आम्ही सुरू केली आणि कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. लाडकी बहिणींचा लाडका भाऊ मी झालो. ही माझी ओळख निर्माण झाली. ही ओळख माझ्यासाठी सर्वात मोठी आहे.

भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा

भाजपने मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसोबत फोनवर चर्चा झाली. त्यांना मी सांगितलं की, सरकार बनवताना माझा कोणताही अडसर येणार नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. तुम्ही आम्हाला मदत केली, अडीच वर्षे संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय मला महायुतीचा प्रमुख म्हणून मान्य असेल. भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील, ज्याला मुख्यमंत्री करतील, त्याला पूर्ण शिवसेनेचे समर्थन आहे’, असेही एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...

error: Content is protected !!