Homeताज्या बातम्याकोंढव्यात राष्ट्रवादीत गोंधळ - राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून अजित पवारांचा फोटो हटवून सुप्रिया सुळे...

कोंढव्यात राष्ट्रवादीत गोंधळ – राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून अजित पवारांचा फोटो हटवून सुप्रिया सुळे यांचा फोटो लावल्याने खळबळ

Times of Maharashtra : कोंढवा परिसरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो हटवून खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो लावल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोंढवा-कौसरबाग प्रभाग क्रमांक १९ मधील संबंधित उमेदवार हे अधिकृतपणे अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत असले, तरी प्रत्यक्षात ते शरद पवार गटाच्या “तुतारी” या चिन्हावर प्रचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांविरोधात स्थानिक पातळीवर वाढता असंतोष, टीका आणि जनतेचा विरोध पाहता हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
“अजित दादा, अजित दादा” म्हणत प्रचार करणारे उमेदवार आता थेट सुप्रिया सुळे यांचा फोटो लावत असल्याने,
“चाचा ही भतीजा है, और भतीजा ही चाचा आहे” अशा राजकीय उपरोधिक चर्चांना कोंढव्यात उधाण आले आहे.

फोटो हटवण्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
अजित पवार यांचा फोटो हटवण्यामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी स्थानिक मतदारांचा वाढता विरोध आणि बदलता राजकीय कौल हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः अजित पवार गटाने भाजपसोबत केलेल्या युतीमुळे कोंढवा परिसरातील अल्पसंख्याक मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

तुतारी” चिन्हाबाबत मतदारांमध्ये संभ्रम
अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील राजकीय समीकरणांमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये असा सूर आहे की, या उमेदवारांना दिले जाणारे मत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपलाच बळकटी देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर कोंढवा मतदारसंघातील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले असून, आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!