Homeताज्या बातम्याराज्यावर अवकाळी पावसाचे सावट; 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी

पुणे : फेंगल चक्रीवादळामुळे राज्यासह देशातील वातावरण बदलाने राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

फेंगल चक्रीवादळ तामीळनाडू व पुद्दुचेरीच्या उत्तर किनारपट्टीवर स्थिर आहे. त्याची वाटचाल कमी वेगाने पश्चिमेकडे होत असून, पुढील काही तासात यया चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, त्याचा परिणाम कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील होईल. पुढील दोन दिवस राज्यातील हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल.

दि. २ ते ५ डिसेंबर दरम्यान, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यासह घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे ३० ते ४० ताशी वेगाने वाहतील. या परिणामाने धाराशिव, रायगड, सांगली, सोलापूर, पुणे, रायगड, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

थडीची लाट काहीशी ओसरली

हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे गेल्या २४ तासांत राज्यातील कमाल व किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काहीशी ओसरली असून, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!