Times Of Maharashtra Desk : उरळी कांचन (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद गटात भाजपश्रेष्ठीकडून ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवरून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पक्षवाढीसाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले असून कार्यकर्त्यांनी व स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध मेळाव्याचे आयोजन केले आहे.
कार्यकर्त्यांची भावना ओळखा
भाजप पक्षश्रेष्टीनी कार्यकर्त्यांच्या भावना न समजून दुसराच उमेदवार पक्षाने माथी भावना व्यक्त करत, सदर उमेदवारी तत्काळ बदलण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या निर्णयामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढल्याचे चित्र दिसून येत असून, येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कार्यकर्ते या बाबत काय निर्णय घेतात हा चर्चेचा विषय आहे.






















