Homeताज्या बातम्याविहीर खोदकामात भीषण अपघात: पोकलेनच्या धक्क्याने दोघे विहिरीत कोसळले, मृत्यूने गाव हादरले

विहीर खोदकामात भीषण अपघात: पोकलेनच्या धक्क्याने दोघे विहिरीत कोसळले, मृत्यूने गाव हादरले

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  गेवराई तालुक्यातील केकतपांगरी शिवारात रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. विहिरीचे खोदकाम सुरू असताना पोकलेन मशीनचा अचानक धक्का लागून दोन जण खोल विहिरीत कोसळले. या दुर्दैवी घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने उपचारादरम्यान प्राण गमावले.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी भारत आसाराम राठोड (वय ३८, रा. हरिलाल नाईक तांडा) यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. कामाची पाहणी करत असताना भारत राठोड आणि गणेश अशोक जगताप (वय ३५, रा. तलवाडा) हे विहिरीच्या काठावर उभे होते. त्याचवेळी पोकलेन मशीनचा जोरदार धक्का लागल्याने दोघेही थेट विहिरीत पडले.

या अपघातात भारत राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या गणेश जगताप यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात येत होते; मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेनंतर पोकलेन चालकाने भीतीपोटी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दोन्ही मृतांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक सुरेश पारधी यांनी केला असून, गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही घटना पुन्हा एकदा बांधकाम आणि खोदकाम कामांदरम्यान सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची जाणीव करून देणारी ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!