Homeक्राईमWhatsApp Cyber Crime"व्हॉट्सॲप वापरताय? सावधान! या चुका पडू शकतात महागात"

WhatsApp Cyber Crime”व्हॉट्सॲप वापरताय? सावधान! या चुका पडू शकतात महागात”

Times of Maharashtra Desk: आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप हे केवळ चॅटिंग ॲप नसून जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. मजकूर संदेश, फोटो, व्हिडिओ, आवाज संदेश किंवा कॉल सर्व काही क्षणात करण्याची सुविधा या ॲपमुळे मिळते. मात्र, या सोयीसोबत काही जबाबदाऱ्या देखील आहेत. चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणे किंवा बेकायदेशीर सामग्री शेअर करणे हे कायद्याने गुन्हा मानले जाते आणि त्यासाठी तुरुंगवासही होऊ शकतो.

बनावट बातम्या आणि अफवा पसरवणे गुन्हा

व्हॉट्सॲपवर मेसेज फॉरवर्ड करणे सामान्य असले तरी, जर त्या मेसेजमध्ये खोटी माहिती, धार्मिक द्वेष, अफवा किंवा हिंसाचार भडकवणारी सामग्री असेल तर ती गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते. आयटी कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार अशा कृतींसाठी दंड, जेल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.देशभरातील अनेक प्रकरणांमध्ये फक्त मेसेज फॉरवर्ड केल्याबद्दल लोकांना अटक करण्यात आली आहे.

आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे बेकायदेशीर

काहीजण विनोद म्हणून अश्लील किंवा संवेदनशील सामग्री शेअर करतात. पण अशी कृती सायबर क्राइममध्ये गणली जाते. एखाद्याच्या संमतीशिवाय त्याचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे किंवा अश्लील सामग्री फॉरवर्ड करणे हे:आयटी कायद्याच्या कलम 67आणि इतर संबंधित कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे.यासाठी ३ ते ५ वर्षांचा तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो.

धमकी, ब्लॅकमेल किंवा बदनामीकारक संदेश पाठवणे
व्हॉट्सॲपवर एखाद्याला धमकावणे, शिवीगाळ करणे, ब्लॅकमेल करणे किंवा कोणाची प्रतिष्ठा खराब करणारे मेसेज पाठवणे हा देखील गुन्हा आहे. अशा संदेशांवर पोलिस तत्काळ कारवाई करू शकतात.

हे हि लक्षात ठेवा?

  1. प्रत्येक संदेश हा डिजिटल पुरावा असतो.
  2. कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा.
  3. आक्षेपार्ह, संशयास्पद किंवा संवेदनशील सामग्री शेअर करणे टाळा.
  4. अज्ञात लिंक किंवा फसवणूक संदेश उघडू नका.

व्हॉट्सॲप वापरणे चुकीचे नाही, पण जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. एका चुकीच्या क्लिकने तुमचे भविष्य बिघडू शकते. म्हणून, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!