Homeआरोग्यडॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; ६४...

डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; ६४ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

Times of Maharashtra Desk, Pune: डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, चहोली बु. येथे सामाजिक बांधिलकी जोपासत आणि आरोग्य जनजागृतीच्या उद्देशाने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) पुढाकाराने दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. चेतन खेडकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयक्यूएसी समन्वयक व कार्यक्रमाचे आयोजक डॉ. गणेश लांडे, तसेच वाघोली ब्लड बँकेचे प्रतिनिधी श्री. विकास गुर्जर आणि श्री. जॉन गायकवाड उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी युवकांच्या सहभागाची गरज अधोरेखित केली.

या शिबिरासाठी वाघोली ब्लड बँक, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले. वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली. या शिबिरात विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एकूण ६४ युनिट रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांनी नोंदणी प्रक्रियेपासून ते रक्तदात्यांच्या अल्पोपहारापर्यंत चोख व्यवस्थापन केले.

संस्थेचे संचालक प्रा. डॉ. ई. बी. खेडकर यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी शिबिराचे संयोजक डॉ. गणेश लांडे आणि वाघोली ब्लड बँकेच्या टीमचे विशेष कौतुक केले, तसेच भविष्यातही अशा मानवतावादी कार्यात विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या समारोपात डॉ. गणेश लांडे यांनी सर्व रक्तदाते, अतिथी आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना अधिक दृढ झाली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!