Homeताज्या बातम्याSupriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम सुप्रिया...

Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम सुप्रिया सुळे यांची जोरदार टीका…

Times of Maharastra Desk, Supriya Sule on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूर येतील कार्यालयात एका कार्यक्रमादरम्यान महिला कार्यकर्त्याने लावणी सादरीकरण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये महिला कार्यकर्त्या वाजले कि बारा या गाण्यावर ठेका धरत नाचताना दिसत आहे. या सादरीकरणामुळे वाद निर्माण झाला आहे. दोन महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर मध्ये या कार्यालयाचे उदघाटन केले होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहराध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी ‘दिवाळी मिलन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रम वेळी एका महिला कार्यकर्तीने लावणी सादर केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधीकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या लावणी सादरीकरणामुळे पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करणे कितपत योग्य? असा प्रश्न विरोधाकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जोरदार टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात कि,

“पक्ष कार्यालयात हे अशा प्रकारचे सादरीकरण बघून मनाला दुःख होते. अतिशय अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ आहे”

पुढे याच साठी तुम्ही शरद पवारांकडू पक्ष काढून घेतला का असा प्रश्न त्यांनी अजित पवार याना केला आहे. हा पक्ष उभा करण्यासाठी अनेक जणांनी मेहनत घेतली आहे, तिथे हे असले प्रकार पाहणं म्हणजे माझं दुर्दैव आहे.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या टाके नंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या लावणी प्रकरणाची खबरदारी घेत पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. तसेच हा प्रकार अयोग्य असून या बाबद योग्य ती कारवाई केली जाईल असे म्हंटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!