Times of Maharashtra Desk: कोकण रेल्वे विभागाकडून एक मोठी माहिती समोर आली आहे. कोकण रेल्वेवरील ठोकूर ते दक्षिण रेल्वेवरील जोकट्टे स्थानका दरम्यान दक्षिण रेल्वेने मेगा ब्लॉक असणार आहे असे सांगितले आहे. बुधवार 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे काही गाड्याचे टाईम लांबणार असल्याची शक्यता आहे.
रेल्वे ब्लॉक चे कारण काय?
ठोकूर ते जोकट्टे यार्ड या परिसरात रुळांचे कनेक्शन आणि नवीन पॉईंट काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर मध्ये पार पडणार आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या उशिराने धावणार आहेत. तसेच काही गाड्या रद्द देखील करण्यात येणार आहेत असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
असे असेल कोकण रेल्वेचे नियोजन
बदलेल्या वेळपत्रकानुसार १४ नोव्हेंबर रोजी सुटणाऱ्या बंगळुरू-कारवार (१६५९५), त्रिवेंद्रम उत्तर-भावनगर (१९२५९) व लोकमान्य टिळक-त्रिवेंद्रम (१६३४५) या गाड्या ८०, १५ आणि २० मिनिटांनी उशिराने राहतील. तसेच १५ नोव्हेंबर रोजी पोरबंदर-त्रिवेंद्रम उत्तर (२०९१०) गाडी २० मिनिटांनी नियंत्रित राहील, तर १६ नोव्हेंबर रोजी जामनगर-तिरुनेलवेली (१९५७८) गाडी ३० मिनिटांनी उशिराने धावणार आहेत. तर १७ नोव्हेंबर रोजी या जामनगर-तिरुनेलवेली गाडीला १०० मिनिटे उशीर होईल, तसेच बंगळुरू-कारवार गाडीला २० मिनिटांचा उशीर होईल. १८ नोव्हेंबर रोजी कोइम्बतूर-जबलपूर (०२१९७) आणि एर्नाकुलम-पुणे (११०९८) या गाड्या अनुक्रमे रात्री ८.०५ व ९.५० वाजता तीन तास उशिराने सुटतील. या दिवशी इतर काही गाड्या १५ ते १५० मिनिटे नियंत्रित राहतील. २३ नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी-मंगळूर (१२१३३) गाडी सुरतकल येथेच थांबवून पुढे रद्द केली जाईल, तर उलट दिशेची १२१३४ मंगळूर-मुंबई गाडी सुरतकलहून सुरू होईल.
प्रवाशना सहकार्याचे आव्हान
कोकण रेल्वेने हाती घेतलेल्या या कामामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामुळे या दिवसात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करावा असे आव्हान कोकण रेल्वे कडून करण्यात आले आहे.






















