Times Of Maharashtra Desk : सोन ही अमूल्य संपत्ती आहे. जगातील सर्वात महाग धातू मध्ये सोन्याची गण्यता होते. मानवी आयुष्यात सोन्याला फार महत्व आहे. आर्थिक दृष्ट्या सोने नेहमी वरचढ राहिले आहे. सध्या सोन्याचे भाव आकाशला भिडत आहे. प्रत्येकांसाठी सोन्याची एखादी वस्तू घेणे हे स्वप्न असते. तर हे सोने कसे व कुठे मिळते माहित आहे का?
जगामध्ये काही नद्यांमध्ये सोने सापडते . त्यात भारताचाही समावेश आहे. भारतातील काही नद्यांच्या माती मध्ये सोन्याचे अंश आहेत. हो तुम्ही जे काही ऐकलं आहे ते खरं आहे . भारताच्या काही नद्यांमध्ये सोने सापडते. ही बाब थोडी आचार्यकारक असली तरी भारताच्या काही नद्यांमधून सोने वाहते हे खरे आहे
भारतात छोट्या मोठ्या अशा असंख्य नद्या आहेत. मानवी जीवनात नद्यांना फार महत्व देखील आहे. असंख्य लोक जीवन नद्यांच्या काठाशी वसलेले आहेत. गंगा , कृष्णा , गोदावरी यमुना, भीमा अशा अनेक नद्या भारताच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. पण या सर्व नद्यांमध्ये एक नाव म्हणजे सुवर्णरेखा नदी . सुवर्णरेखा नदीच्या प्रवाहात सोने वाहते असे म्हणतात . सुवर्णरेखा नदीत नैसर्गिक सोन्याचा साठा आहे. आणि हीच ह्या नदीची ओळख बनली आहे. आज देखील येथील आदिवासी समाज या नदीतून पारंपरिक पद्धतीने सोने काढते.
सुवर्णरेखा नदी नक्की आहे तरी कुठे?
रांची ही झारखंड ची राजधानी . याच राजधानीच्या दक्षिणे कडे असणाऱ्या छोटा नागपूर पठारातून सुवर्णरेखा नदीचा उगम होतो. ही नदी 400 किलोमीटर वाहत जाऊन पश्चिम बंगाल आणि ओडिशातून प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते. रांची जवळ असलेल्या पिस्का या नदी काठच्या गावात अनेक वर्षापासून सोन्याचे उत्खनन केले जाते. याच ठिकाणी नदीचे उगमस्थान आहे अशी येथील लोकांची मान्यता आहे आणि आज ही या नदीच्या खोऱ्यात सोने सापडेल म्हणून येथील लोक किनाऱ्यावर बऱ्याचदा सोने शोधत असतात.
सुवर्णरेखा नदी काव्यातून अजरामर, नदीकाठी अनेक प्रकल्प स्थापित
रवींद्रनाथ टागोर आणि बीभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी त्याच्या काव्यरचनेतून अनेकवेळा सुवर्णरेखा नदीला अजरामर केले आहे. आजही या नदीचा जलविद्युत प्रकल्पासाठी मोठा वाटा आहे. सोबतच नदीच्या किनाऱ्यावर अनेक खाण खनिज प्रकल्प आहेत. विषश म्हणजे सर्वात जास्त तांब्याचे साठे याच नदीच्या खोऱ्यात आहेत.
भारतातील सोने वाहणारी दुसरी एक नदी म्हणजे सुबनसिरी नदी. ही नदी अरुणाचल प्रदेशातून उगम पावते याही नदीच्या खोऱ्यातील वाळूत सोन्याचे अंश सापडतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार नदी खनिजांनी समृद्ध असलेल्या भागातून वाहते. जेव्हा पाणी या खडकांना घासते, तेव्हा हळू हळू सोन्याचे छोटे कण बाहेर पडतात. हे कण मग नदीच्या प्रवाहाबरोबर पुढे जातात. आज ही येथील आदिवासींसाठी या नदीतून सोने बाहेर काढणे हे त्यांच्या उपजीविकेचा भाग आहे.
भारतात सापडलेल्या नवीन सोन्याच्या खाणी
एसबीआय रिसर्च’च्या संशोधनानुसार २०२५ मध्ये ओडिशा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशमध्ये सोन्याच्या नवीन खाणींचा शोध लागला आहे. ओडिशातील देवगढ, केओंझर व मयूरभंज या विविध जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या नवीन खाणी सापडल्या आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने (GSI) या ठिकाणी अंदाजे १,६८५ किलो सोने शोधून काढले आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे सापडलेल्या सोन्याचा साठा लाखो टन असण्याचा अंदाज आहे.






















