Times of Maharashtra Phaltan Elecstion Update: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत.बऱ्याच भागातील उमेदवारी जाहीर झाली आहे तर अजूनही काही भाग बाकी आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फलटण नगरपालिका प्रभाग १० मधून मोनिका गायकवाड यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाने फलटण नगरपालिका राजकीय परिस्थितीत नव्याने जोर आला आहे. पूर्वीच्या निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक चव्हाण यांचे गढ मानला जात होता, परंतु 2024 च्या निवडणुकीत अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. आणि या वर्षी हा बालेकिल्ला मोनिका गायकवाड लढवणार आहेत.
फलटण तालुक्यातील विकासासाठी सदैव तत्पर महादेव आप्पा गायकवाड यांच्या पत्नी मोनिका गायकवाड या शरद पवार गटातून तुतारी चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे फलटण तालुका अध्यक्ष धर्मराज यजगर पाटील यांनी जाहीर केले आहे. फलटण तालुक्यात नगरपालिका प्रभाग १० मधून निवडणुकीत महादेव (आप्पा) गायकवाड यांच्या पत्नी मोनिका महादेव गायकवाड ह्या उमेदवार म्हणून उभी राहणार आहेत. महादेव गायकवाड हा फलटणच्या लोकांच्या अडचणी सोडवण्यात तसेच तालुक्याच्या सातत्यपूर्ण विकासामध्ये अंतहीन प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जातात.
आधी लोकांसाठी कामे केली मात्र सत्ता मिळाल्यानंतर सेवा करणार
“ही निवडणूक फक्त एखाद्या तात्पुरत्या स्वप्नासाठी नाही, तर आम्हाला गरिब, गोरगरीब लोकांची सतत मदत करून त्यांच्यातुन पुढे जाण्याची इच्छा आहे.” त्यांनी म्हटले की, आधीही लोकांसाठी कामे केली गेली आहेत, मात्र सत्ता मिळाल्यानंतर सेवा अधिक प्रभावीपणे करिता येणार आहे. असे उमेदवारी मिळताच मोनिका गायकवाड यांनी म्हटले आहे. महादेव आप्पा गायकवाड रात्रंदिवस लोकांच्या अडचणींना समजून घेत त्यावर काम करत असतात आरोग्य, शाळांमध्ये फी अशा अनेक सामाजिक बाबींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. माझा विश्वास आहे की , फलटण नगरपालिका लोकांच्या विश्वासाने स्वबळावर पुढे नेली जाईल व लोकांच्या आवाजाला न्याय मिळेल असेच आम्ही काम करू. शरद पवार गटाचा हा निर्णय स्पष्टपणे दर्शवितो की या पक्षाने गमावलेला फलटण नगरपालिका पुन्हा ताकदीने जिंकण्याचा सोबत मित्र पक्ष यांनी मिळून संकल्प केला आहे.






















