Times of Maharashtra Desk : सुप्रसिद्ध अभिनेते सायजि शिंदे यांच झाडांवरच प्रेम सर्वानाच माहीत आहे. अभिनय क्षेत्रासोबात सायजि शिंदे ही समाजकारणात देखील सक्रिय असतात. त्यांनी आता पर्यन्त अनेक झाडे लावली आहेत आणि ती जगवली देखील आहेत. कुठे झाडांची कत्तल होत असेल तर सायजि शिंदे तिथे जाऊन ते थांबवतात. झाडे म्हणजे आयुषाचा एक अविभाज्य भाग आहे असे ते म्हणतात नुसत म्हणत नाही तर ते तास जगतात. काही दिवसांपूर्वीच सायजि शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. आणि सध्या हा पक्ष सतेत आहे. सध्या सरकार घेत असलेल्या नाशिक वृक्ष तोड निर्णयावरून सायजि शिंदे यांनी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
काय म्हणाले सायजि शिंदे?
नाशिक मधील तपोवन येथे अनेक झाडे आहेत. नाशिकमधील कुंभ मेळाव्यासाठी तपोवन येथील काही झाडं तोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याला सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केला आहे.त्यांनी त्यांनी कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवी आहे असे म्हणत प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत., ‘१०० जणांचे बलिदान देऊ मात्र नाशिकमधील एकही झाड तोडू देणार नाही. माणसं पेटून उठतील. मी फक्त निमित्त असेन. तपोवन येथील कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवी आहे. असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे. खूप विरोध करावा लागेल. झाड तोडून दहा झाडे लावू हे विधान फालतू आहे. सरकार आपलं असूनही बेजबाबदारपणे वागत आहे. खरं तर माझ्या तोंडात शिव्या येत आहेत. माझ्या डोळ्यादेखत मुलं मारावी तशी झाडं तोडली जात आहेत. हे आपण वाचवलच पाहिजे.’ असा म्हणत त्यांनी लोकाना आव्हान केले आहे.






















