Homeताज्या बातम्याPune City: येथे वर्षातून दोनदा खोदला जातो रस्ता; नागरिकांमध्ये संतापाची लाट; पालिकेच्या...

Pune City: येथे वर्षातून दोनदा खोदला जातो रस्ता; नागरिकांमध्ये संतापाची लाट; पालिकेच्या करोडो रुपयांचा चुराडा?

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे शहरातील भवानी पेठ येथील मोटार स्टँड चौक ते विशाल सोसायटी दरम्यानचा सुमारे २५० मीटर लांब आणि ३५ फूट रुंद रस्ता बनवण्याच्या नावाखाली ह्याच वर्षात दुसऱ्यांदा खोदल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे ना लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे, ना महापालिकेचं लक्ष आहे. केवळ टेंडर चा माल मिळवण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

लष्कर भागातील भवानी माता मंदिराजवळील मोटार स्टँड चौक ते चुडामण तालीम चौकातून थेट हडपसरकडे जाणारा २५० मीटर रस्ता पुणे महापालिकेने विकासकामांच्या नावाखाली गेल्या चार आठवड्यापूर्वी खोदला आहे, त्यामुळे हा संपूर्ण रस्ता मागील एक महिन्यापासून बंद आहे. या भागातील कुमार गॅलेक्सी, विशाल सोसायटी, अजमेरा सोसायटी, पद्मजी पॅराडाईझ ह्या सोसायटयांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. या सोसायट्यांमध्ये व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे, त्यामुळे त्यांना दुचाकी, चारचाकी वाहने बाहेर काढणे अशक्य झाले आहे. तर दुसरीकडे गृहिणींना बाजारात जाणे, लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

भवानी पेठ मार्गावरील बससेवा ठप्प

मागील वीस दिवसांपासून या मार्गावरून ये जा करणाऱ्या महापालिकेच्या हडपसर, डेक्कन, कोथरूड, वारजे, न.ता वाडी ह्या बससेवेलाही मोठा फटका बसला असून, त्यामुळं येथून कामासाठी इतरत्र जाणारे नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

वर्षातून दोनदा करोडो रुपयांचा चुराडा

वर्षभरापूर्वी ह्याच मार्गावर ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामासाठी रस्ता खोदला होता. हे काम सहा महिन्यातून अधिक काळ सुरू होते. त्यासाठी चार ते पाच कोटी रुपये निधी खर्च झाला होता. सहा महिन्यापूर्वीच काम केलेलं असताना, रस्ता पुन्हा खोदल्याने मागील पैसे तर वाया गेलेच मात्र आतादेखील करोडो रुपयांचा चुराडा झाला आहे, याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

अधिकाऱ्यांचे मौन ?

सहा महिन्यापूर्वीच करोडो रुपये खर्च करून बांधण्यात असलेला रस्ता पुन्हा बांधत असताना अधिकारी वर्ग मात्र मौन बाळगून आहे. अभियंता, निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त टेंडर काढताना झोपेत सही करतात का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!