Homeताज्या बातम्यापुण्यात भाजपचं खाते उघडलं; दोन नगरसेवक बिनविरोध, कार्यकर्त्यांचा जल्लोष...

पुण्यात भाजपचं खाते उघडलं; दोन नगरसेवक बिनविरोध, कार्यकर्त्यांचा जल्लोष…

Times of Maharashtra Desk: राज्यभर बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्याचा सपाटा लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पुण्यातही खाते उघडले आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 35 सनसिटी–माणिक बाग येथून भाजपच्या मंजुषा नागपुरे, तर प्रभाग 35 ड मधून श्रीकांत जगताप हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात जोरदार जल्लोष केला.

पुणे महापालिका निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून यावेळी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच काँग्रेस–ठाकरे गट अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत पुणे महापालिकेची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, अजित पवार गटही पुन्हा एकदा महापालिकेवर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

प्रभाग 35 मध्ये अर्ज माघारीमुळे बिनविरोध निवड
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने प्रभाग क्रमांक 35 मधून मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आल्या. या प्रभागात एकूण सहा अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीत बाद झाले, तर उर्वरित तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. परिणामी, मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्याचप्रमाणे, प्रभाग 35 ड (सर्वसाधारण जागा) येथे नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे श्रीकांत जगताप बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपने पुण्यात दोन जागांवर विजय मिळवला आहे.

पुण्यात राजकीय समीकरणे स्पष्ट
पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात 40 जागांवर ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.

दुसरीकडे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. शिंदे गटाची शिवसेना 123 जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असून, उद्धवसेना–मनसे युतीही झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या काही जागा मनसेला देण्यात येणार आहेत. भाजप आणि शिंदे गटात युती न झाल्याने पुणे महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!