Homeताज्या बातम्यानक्षलपीडित कुटुंबांना दिलासा; गडचिरोलीत 29 तरुणांना शासनसेवेत संधी

नक्षलपीडित कुटुंबांना दिलासा; गडचिरोलीत 29 तरुणांना शासनसेवेत संधी

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून पुनर्वसनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Times Of Maharashtra : नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबांतील 29 तरुणांना थेट शासनसेवेत सामावून घेण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात संबंधित कुटुंबीयांना शिपाई पदावरील नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. कुटुंबातील सदस्य गमावल्याचे दुःख असतानाही शासनाने रोजगाराच्या माध्यमातून दिलासा दिल्याची भावना यावेळी उपस्थितांच्या मनात दिसून आली.

राज्य सरकारच्या धोरणानुसार नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबातील एका सदस्याला शासनसेवेत संधी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, 29 कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणि आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 25 युवकांना थेट रोजगा

गडचिरोली येथील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 25 विद्यार्थ्यांना नववर्षाच्या सुरुवातीलाच नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मार्गदर्शन करताना, स्थानिक युवकांना विकास प्रक्रियेचा थेट लाभ मिळावा यासाठी कौशल्यविकास विभाग वेगाने काम करत असल्याचे सांगितले.

गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी 31 एकर शासकीय जमीन मंजूर

जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी सुमारे 31 एकर (12.75 हेक्टर) शासकीय जमीन मंजूर केली आहे.

ही जमीन विसापूर आणि सोनापूर येथे असून, विसापूर येथील सर्व्हे नंबर 343/1 मधील 2.71 हेक्टर आणि सोनापूर येथील सर्व्हे नंबर 135/1 मधील 10.04 हेक्टर जमीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे वर्ग करण्यात येणार आहे. ही जमीन भोगवटा मूल्यरहित व महसूलमुक्त किमतीने मंजूर करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!