Homeताज्या बातम्यामहापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; दगडू सकपाळ–एकनाथ शिंदे मध्यरात्री भेटीने...

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; दगडू सकपाळ–एकनाथ शिंदे मध्यरात्री भेटीने खळबळ

Times of Maharashtra Desk: महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ वॉर्ड क्रमांक 203 मधून ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने सकपाळ नाराज असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीवर स्पष्टीकरण देताना दगडू सकपाळ म्हणाले की, “मी आजारी आहे, ही बाब कळाल्यानंतर माझी प्रकृती विचारण्यासाठी एकनाथ शिंदे आले होते. यामागे दुसरा कोणताही राजकीय हेतू नाही. त्यांच्या सोबत राणेंचे चिरंजीव आणि देवरांचे चिरंजीवही उपस्थित होते.”दरम्यान, पक्षातील नाराजी स्पष्ट करताना सकपाळ म्हणाले, “जोपर्यंत गरज होती तोपर्यंत पक्षासाठी काम केलं. आता गरज संपली आहे, त्यामुळे पक्षाकडून विचारणाही होत नाही. किमान एक फोन आला असता तरी समाधान झालं असतं. पण पक्षाकडून कोणतीच दखल घेतली जात नसेल तर घरी बसलेलं बरं.”

तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “मी पक्षाबाबत नाराज आहे, पण मातोश्रीबाबत काहीही बोलणार नाही. जे काही मिळालं ते त्यांच्या आशीर्वादामुळेच. मी फक्त मुलीसाठी एक जागा मागितली होती. पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा दिल्या, त्यांनी कधी पक्षासाठी रक्त सांडलं आहे का, अशी खंत आहे.”भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत बोलताना दगडू सकपाळ यांनी सध्या तरी कुठेही जाण्याचा विचार नसल्याचं सांगितलं. मात्र, “कुणाला गरज वाटली तर पुढे विचार करू,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!