Homeमहत्त्वाचेसावदा मंडळात चक्का जाम आंदोलन; पीक विमा भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

सावदा मंडळात चक्का जाम आंदोलन; पीक विमा भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : सावदा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवार, दि. २३ जानेवारी रोजी चोपडा–अंकलेश्वर महामार्गावर (सावदा–रावेर रोड) चक्का जाम आंदोलन केले. निधर्ष शेतकरी संघर्ष समिती, सावदा मंडळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सन २०२४–२५ च्या हंगामात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे तसेच तापमानातील चढ-उतारामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पंतप्रधान पीक विमा योजना व हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला असतानाही विमा कंपन्यांकडून अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून कर्जबाजारीपणात वाढ झाली आहे.

प्रशासनाकडून १५ जानेवारीपर्यंत पीक विम्याची भरपाई दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विम्याची सुमारे १५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.

या आंदोलनात सावदा मंडळासह धोरगव्हाण, रणगाव, रायपूर, तासखेडा, उधळी बुद्रुक, उधळी खुर्द, लुमखेडा परिसरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. चक्का जाममुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

आता केवळ आश्वासन नको, थेट खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. अन्यथा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कुटुंबासह बेमुदत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!