Homeमहत्त्वाचेजळगावमध्ये काळाचा घाव! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, आजोबा व चिमुकला नातू ठार,...

जळगावमध्ये काळाचा घाव! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, आजोबा व चिमुकला नातू ठार, महिलाची मृत्यूशी झुंज

विनोद पवार (जळगाव  प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील पाळधी परिसरात मंगळवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. शहरातील काम आटोपून दुचाकीवरून गावाकडे परतणाऱ्या कुटुंबावर भरधाव ट्रकने अचानक काळाचा घाव घातला. या भीषण अपघातात आजोबा आणि त्यांचा लहानगा नातू जागीच ठार झाले, तर दुचाकीवरील एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

शिंगणगाव–सावदा बायपास रस्त्यावर पाळधी गावाजवळ हा अपघात झाला. MH 05 AM 3248 क्रमांकाच्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर दूर फेकले गेले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी देशमुख राठोड आणि त्यांचा नातू परेश राठोड यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. दुचाकीवरील महिला बेबीबाई राठोड यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देत शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांनी तत्परतेने ताब्यात घेतले असून पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या अपघातामुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, बायपास रस्त्यावरील वाढते अपघात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!