देवा आत्राम ( यवतमाळ प्रतिनिधी ) : पांढरकवडा शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तहसीलदार मा. इंगळे साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला.
या सोहळ्यास पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मा. तवारे सर, नगराध्यक्ष मा. सोनुभैय्या बोरले, विविध शाळांचे शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत देशासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. नृत्य, गीत, भाषण व समूहगायनाने उपस्थितांची मने जिंकली. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले.
यावेळी आर्णी, केळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. राजूभाऊ तोडसाम साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, भव्य आणि यशस्वीपणे पार पडला.






















