Homeताज्या बातम्याअजित पवार यांचा दशक्रिया विधी आधीच पार; पुढील कोणतेही धार्मिक विधी होणार...

अजित पवार यांचा दशक्रिया विधी आधीच पार; पुढील कोणतेही धार्मिक विधी होणार नाहीत

Times Of Maharshtra Desk : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर करण्यात येणाऱ्या धार्मिक विधींविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दशक्रिया विधी नियोजित तारखेपूर्वीच पार पडल्याचे त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे आता पुढील दहावा किंवा तेरावा दिवस असा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर 30 जानेवारी रोजी अस्थी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. त्याच दिवशी सोनगाव येथील कऱ्हा–नीरा संगमावर अस्थी विसर्जन करण्यात आले.

याच वेळी कुटुंबीयांनी आवश्यक ते सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्यामुळे दशक्रिया विधीही 30 जानेवारीलाच पार पडल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, आज बारामतीच्या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘सहयोग’ या निवासस्थानी दुपारी चार वाजेपर्यंत कुटुंबीय भेटी स्वीकारणार असून, सकाळपासूनच नेते, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळातही हालचालींना वेग आला आहे. पार्थ पवार यांच्या राज्यसभेतील संभाव्य प्रवेशाबाबत चर्चा सुरू असून, सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

error: Content is protected !!