Homeताज्या बातम्यामाजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या 4 मजली व्यावसायिक इमारतीवर बुलडोझर

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या 4 मजली व्यावसायिक इमारतीवर बुलडोझर

Times Of Maharshtra Desk : न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर अहेरी नगरपंचायत प्रशासनाने मोठी कारवाई करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील चार मजली व्यावसायिक इमारतीवर थेट बुलडोझर चालवला. राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेली ही इमारत नगरपंचायतीची अधिकृत परवानगी न घेता बांधण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

नगरपंचायतीकडून यापूर्वी अनेक वेळा अजय कंकडालवार यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकरण न्यायालयात गेले. अहेरी न्यायालयाने दोन वेळा सदर इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात अजय कंकडालवार यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, तेथे तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी उच्च न्यायालयात जाण्याची संधी असूनही त्यांनी पुढील अपील दाखल केले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अहेरी न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार आज नगरपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. इमारत पाडण्याच्या कामादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेसीबी व बुलडोझरच्या साहाय्याने इमारतीचे पाडकाम सुरू असताना परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजय कंकडालवार हे काँग्रेस पक्षाचे प्रभावी नेते असून त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे ही कारवाई राजकीय हेतूपुरस्कृत तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

एकीकडे प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे सांगितले असले, तरी दुसरीकडे या कारवाईच्या वेळेवर आणि पद्धतीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!