Homeताज्या बातम्याशिवसेना उमेदवाराला मत नको! एकनाथ शिंदेंच्या सोलापूरमधील वक्तव्याने राजकीय खळबळ

शिवसेना उमेदवाराला मत नको! एकनाथ शिंदेंच्या सोलापूरमधील वक्तव्याने राजकीय खळबळ

Times Of Maharashtra Desk : जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात घेतलेल्या जाहीर सभांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील सभांमधून शिंदेंनी दिलेले राजकीय संकेत सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहेत.

बार्शीतील सभेत ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल हे थेट शिंदेंच्या व्यासपीठावर दिसून आले, तर मोहोळ येथील सभेत शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी शिंदेंचे स्वागत केले. त्यामुळेच या दोन्ही सभा राजकीयदृष्ट्या अधिकच लक्षवेधी ठरल्या.

मात्र, मोहोळमधील सभेत शिंदेंनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांनाच धक्का दिला. नरखेड पंचायत समिती गणात शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका, आघाडीचा धर्म पाळा, असे थेट आवाहन त्यांनी मंचावरून केले. विशेष म्हणजे हे वक्तव्य खुद्द शिवसेना मुख्य नेत्याकडून आल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम आणि खळबळ उडाली आहे.

नरखेड गणात शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती असतानाही एकाच गणातून दोन उमेदवार रिंगणात उतरल्याने आधीच गोंधळाची स्थिती होती. शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रगती दगडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारसभेदरम्यान स्थानिक नेत्यांकडून शिंदेंना एक चिठ्ठी देण्यात आली. ती वाचल्यानंतर शिंदेंनी ज्योत्सना पाटील या आमच्या उमेदवार नाहीत, येथे आघाडीचा धर्म पाळावा, असे स्पष्ट केले.

दरम्यान, ज्योत्स्ना पाटील या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या असून, शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळेच शिंदेंनी जाहीरपणे त्यांना शिवसेनेचा उमेदवार नसल्याचे सांगितल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, शिंदेंच्या भूमिकेमुळे युतीतील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!