Homeमहत्त्वाचेमुंढवा जमीन प्रकरणावरून संजय राऊतांचा पार्थ पवारांवर हल्लाबोल!

मुंढवा जमीन प्रकरणावरून संजय राऊतांचा पार्थ पवारांवर हल्लाबोल!

Times Of Maharashtra Desk : मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार यांना जरी क्लीन चिट मिळाली असली, तरी या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले ताशेरे सहज पुसले जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना (उबाठा)  पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.

निर्दोषत्व  सिद्ध केलं असतं तर बरं झालं असतं!

पार्थ पवार आता राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात आले असून, त्यांनी चौकशीला सामोरे जाऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करायला हवे होते, .  नवीन कार्यकर्ता राजकारणात येतो तेव्हा त्याच्यावर असलेले आरोप आणि संशयाचे मळभ दूर करणे आवश्यक असते, अशी थेट मागणी राऊत यांनी केली. मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली असून, खरगे समितीचा अहवाल लवकरच सादर होण्याची शक्यता आहे. या व्यवहारात पार्थ पवार यांचे नाव किंवा संमती नसल्याने त्यांना क्लीन चिट देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

हा बेनामी व्यवहार झाला.

संजय राऊत यांनी  या व्यवहाराला कायदेशीर भाषेत याला ‘बेनामी व्यवहार’ म्हटले आहे.महाराष्ट्रात कायदा सर्वांसाठी समान नाही आणि देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाहीत, असा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सध्याचे सरकार आणि मुख्यमंत्री त्यांचेच असून, देवेंद्र फडणवीस स्वतः पक्ष चालवत असल्यामुळेच या घडामोडी घडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

विलीनीकरण ही पक्षांतर्गत बाब

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बोलताना राऊत म्हणाले की, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले, पद, प्रतिष्ठा आणि ताकद दिली, तेच आज शरद पवारांनी काय करावे आणि काय करू नये, याचे सल्ले देत आहेत. विशेषतः सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत, हे अत्यंत ‘इंटरेस्टिंग’ आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत विलिनीकरणाशी शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत राऊत म्हणाले की, आमचा विषय फक्त इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीपुरताच आहे. शरद पवार जोपर्यंत या आघाडीचे सदस्य आहेत, तोपर्यंतच आमचा या विषयाशी संबंध आहे. विलिनीकरणाच्या संदर्भात सध्या विविध चर्चा सुरू असून, एक गट चर्चा झाल्याचे म्हणतो, तर दुसरा गट नकार देतो. त्यामुळे नेमका विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!