Homeक्राईमजळगावात बनावट वैद्यकीय कागदपत्रांद्वारे विमा फसवणूक; डॉक्टर व लॅबचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात बनावट वैद्यकीय कागदपत्रांद्वारे विमा फसवणूक; डॉक्टर व लॅबचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

विनोद पवार ( जळगाव  प्रतिनिधी ) :  विमाधारकाच्या संमतीशिवाय रुग्णालयात दाखल दाखवून बनावट वैद्यकीय अहवालांच्या आधारे विमा कंपनीकडून क्लेम उचलल्याचा गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टर तसेच पॅथॉलॉजी लॅबच्या व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार विजय संताराम गुप्ता (वय २५, रा. तुघलकाबाद, नवी दिल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्याकडे न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीची वैद्यकीय विमा पॉलिसी आहे. २४ सप्टेंबर २०२४ रोजी ते प्रत्यक्षात कोणत्याही रुग्णालयात दाखल नसताना, त्यांच्या नकळत त्यांना जळगावातील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल दाखविण्यात आले, असे तपासात समोर आले आहे.

तसेच त्याच कालावधीत संबंधित पॅथॉलॉजी लॅबमध्ये त्यांच्या नावाने विविध वैद्यकीय तपासण्यांचे बनावट अहवाल तयार करण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडे उपचार खर्चाचा दावा (क्लेम) सादर करण्यात आला आणि तो मंजूर करून रक्कम उचलल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारात तक्रारदाराच्या ओळखीचा व विमा पॉलिसीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक चौकशीत रुग्णालयातील नोंदी, तपासणी अहवाल व विमा क्लेम कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर तक्रारदाराने अधिकृत तक्रार दाखल केली. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू केली आहे. तसेच विमा कंपनीकडूनही व्यवहारांची माहिती मागविण्यात आली आहे.

दरम्यान, विमा क्षेत्रात वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करून दोषींवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू असून, तपासाअंती आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!