Homeमहाराष्ट्रगांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट - नगरपालिकेची मंजुरी आहे...

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात

संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री सुमारे १२.३० वाजता रस्त्याचे काँक्रीटीकरण व दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.प्रत्यक्ष पाहणीदरम्यान रस्त्यावर खडी, सिमेंट व इतर साहित्य टाकण्यात आले होते. काँक्रीट मिक्सर, पंप मशीन आणि पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. अनेक कामगार रात्री उशिरापर्यंत काम करताना दिसून आले.

या कामाबाबत नागरिकांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे की, हे काम ठेकेदाराकडून नेमके कधीपासून सुरू आहे? तसेच रात्री १२.३० वाजेपर्यंत काम सुरू ठेवण्यासाठी कोणती अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का?सदर परिसर हा दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील आहे. त्यामुळे या कामासाठी नगरपालिकेची अधिकृत मंजुरी आवश्यक आहे.नियमांनुसार रस्त्याची कामे रात्री करता येतात, मात्र त्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी असणे आवश्यक असून, रात्री १० नंतर मोठा आवाज करणाऱ्या यंत्रांच्या वापरासाठी विशेष परवानगी बंधनकारक आहे.

दरम्यान, कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सूचना फलक व सुरक्षेसाठी बॅरिकेड्स नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे रात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.ठेकेदाराने हे काम नेमके कधीपासून सुरू केले, रात्री कामासाठी परवानगी आहे की नाही आणि याबाबत दौंड नगरपालिकेची भूमिका काय, याचा खुलासा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

error: Content is protected !!