Homeमहाराष्ट्रतांदळवाडी हवेली वस्ती जि.प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

तांदळवाडी हवेली वस्ती जि.प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

विष्णू गायकवाड (गेवराई प्रतिनिधी ) : बीड तालुक्यातील तांदळवाडी हवेली वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती बीडचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर शाळेच्या इमारतींचे लोकार्पणही करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हिंदी, मराठी व चित्रपट गीतांसह गोंधळी गीत, भीमगीत आणि विविध लोकगीते यांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या अप्रतिम कलागुणांचे दर्शन घडल्याने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक सादरीकरणाला प्रोत्साहन म्हणून नागरिकांनी १००, २०० व ५०० रुपयांची बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी कामखेडा केंद्रातील केंद्रप्रमुख सुनिता ससाने, केंद्रीय मुख्याध्यापक विक्रम गोरे, तांदळवाडीचे सरपंच कैलास निर्मळ, उपसरपंच परमेश्वर कोळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच विषय शिक्षक संतोष ठाकरे, एस. एम. पारधी, समिक्षा खाडे, समाधान अडसुळे, आशाताई परतेती, निशा कंगाली उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ शिक्षक प्रल्हाद शिंदे, संतोष भाले, रकटे, राजाराम लकडे, आदर्श मुख्याध्यापक अरुण चौधरी, पत्रकार विष्णू गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेत कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांच्या कार्याचे तुकाराम जाधव यांनी विशेष कौतुक केले. या शिक्षकांनी वस्ती शाळेला नंदनवन बनवत विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्नेहसंमेलनाची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत जाधव यांनी केले, तर मुख्याध्यापक अरुण चौधरी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!