Homeमहाराष्ट्रझाडूचा राजा अन् बाबांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा” : डॉ. धनराज खानोरकर

झाडूचा राजा अन् बाबांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा” : डॉ. धनराज खानोरकर

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : संत हे अनंत असतात. जगातील आघात सोसत समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करणाऱ्यांनाच खरे संत म्हणतात. अशा संतांमध्ये संत गाडगेबाबा हे एकमेव “बाबांचे बाबा” होते. त्यांनी झाडूला शस्त्र मानत स्वच्छतेचा संदेश दिला, भोंदू बाबांचा पर्दाफाश केला आणि कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व व माणसाच्या कर्माची जाणीव समाजात रुजवली. त्यामुळे खरा “झाडूचा राजा” आणि “बाबांचे बाबा” म्हणजे संत गाडगेबाबा होत, असे मार्मिक आणि काव्यमय विवेचन प्रसिद्ध कवी व लेखक डॉ. धनराज खानोरकर यांनी केले.

ते ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात आयोजित ‘संत गाडगेबाबा : व्यक्ती आणि विचार’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. युवराज मेश्राम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शेकोकर यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, गाडगेबाबांनी समाजाला स्वच्छतेचे, पर्यावरण संवर्धनाचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मानवी स्वच्छता आणि पर्यावरण स्वच्छता यांचा संदेश त्यांनी कृतीतून दिला, हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

डॉ. खानोरकर यांनी आपल्या व्याख्यानात गाडगेबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा वेध घेतला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि सामाजिक कुरीतींवर कठोर प्रहार करत लोकांना जागृत केले, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जगदिश गुरनुले यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!