Homeमहाराष्ट्रप्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’चा शुभारंभ

प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’चा शुभारंभ

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी) : शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या तात्काळ सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’चा शुभारंभ शनिवारी (दि.७) ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगाण येथे प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार लीना बोबाटे, महानंदा मडावी, प्रशांत धकाते, निरीक्षक अधिकारी अमित कांबळे, कृषी अधिकारी स्वाती घुले, सहाय्यक निबंधक मडावी तसेच चौगाणचे सरपंच आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या अभियानाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांनी सांगितले. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि कोणीही लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमादरम्यान विविध विभागांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निराकरणही करण्यात आले. आगामी काळात होणाऱ्या मंडळस्तरीय महसूल शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार सतीश मासाळ यांनी केले.

या कार्यक्रमाला मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सुमारे ५०० ते ६०० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. अभियानांतर्गत ७/१२ उतारे अद्ययावत करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, विविध प्रमाणपत्रांचे वितरण, ई-मोजणी, पीएम किसान योजना, तसेच इतर महसूल सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!