Homeआरोग्यहडपसरमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हडपसरमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धीरज महांगरे ( पुणे शहर प्रतिनिधी ) :  हडपसर परिसरातील यश रवी पार्क, चिंतामणी नगर येथे भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक रहिवाशांच्या मते, काही कुत्र्यांकडून चावण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे रोजच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. विशेषतः दोन चाकी वाहनांवरून प्रवास करणारे नागरिक, कामावर ये-जा करणारे कर्मचारी आणि शाळेत जाणारी लहान मुले यांना या समस्येचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

रात्रीच्या वेळेस ही परिस्थिती अधिक गंभीर होते. उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती सतावत आहे. भटक्या कुत्र्यांचे टोळके रस्त्यांवर फिरताना दिसत असल्याने परिसरात असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

नागरिकांनी स्पष्ट केले की, त्यांना प्राण्यांविषयी सहानुभूती आहे आणि प्राणीप्रेमालाही ते विरोध करत नाहीत. मात्र, त्याचबरोबर नागरिकांची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी आणि योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा पुणे शहर प्रतिनिधी धीरज महांगरे यांनीही प्रशासनाला या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!