Homeआरोग्यमहाराष्ट्र योग शिक्षक संघाचा चतुर्थ वर्धापन दिन गेवराईत उत्साहात साजरा

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा चतुर्थ वर्धापन दिन गेवराईत उत्साहात साजरा

विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : महाराष्ट्र योग शिक्षक संघ, गेवराई शहर समितीच्या वतीने संघाचा चतुर्थ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ५.३० ते ७ या वेळेत आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेला हार-फुले अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संघाच्या १२ सूत्री मागणीपत्राचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या योगसाधकांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सकारात्मक वातावरण निर्माण केले. यावेळी योग गीत सादर करण्यात आले तसेच सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गुढीपाडवा आणि संघाच्या स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवार, दि. १९ मार्च रोजी आर. बी. अट्टल महाविद्यालयाच्या योगा हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सूर्यनमस्कार, सूर्य अभिषेक, अग्निहोत्र, ओमकार जप, गायत्री मंत्र जप, महामृत्युंजय मंत्र जप आणि सूर्य दर्शन यांसारख्या विविध आध्यात्मिक व योगसाधना करण्यात आल्या. नव्या उगवत्या सूर्याचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. तसेच सहभागी सदस्यांनी एकमेकांना गळाभेट देत व चरणस्पर्श करून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असून याला शालिवाहन संवत्सर असेही म्हटले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी नवीन कार्यारंभ, खरेदी व व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते. घराबाहेर उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक असून ती नकारात्मक शक्तींना दूर ठेवते, अशी श्रद्धा आहे. वसंत ऋतूच्या प्रारंभामुळे निसर्गात नवचैतन्य निर्माण होत असल्याने हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो.

या प्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण परदेशी, प्रा. राजेंद्र बरकसे, विलास मडकर, प्रकाश गिरी, बळीराम यादव, अॅड. सुभाष निकम, सुरेश मानधने, शिवप्रसाद भुतडा, मिलिंद कुलकर्णी, शंकर सूर्यवंशी, मनोहर सराटे, जयप्रकाश बाहेती, वैजिनाथ मोरे, विष्णू शेलार, रामकृष्ण चेडे, अमित शिखरे, प्रा. सतीश जाधव, प्रा. सुरेश पाटील, दीपक पुरी, नितीन कुलथे, सावता नाईक, राजेंद्र निकम, डॉ. भगवान जाधव, प्रा. रामलिंग गुळवे यांच्यासह अनेक योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!