Homeताज्या बातम्यासामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली (तासगांव) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. तासगाव येथे हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांना ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या गौरवामुळे म्हसवड परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ४५ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजकुमार डोंबे यांनी मागासवर्गीय, दलित, वंचित, महिला, बेरोजगार यांसारख्या घटकांच्या प्रश्नांना न्याय

मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा दिला आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदेशीर लढे उभे करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. विविध कंपन्यांमधील मोठमोठे घोटाळे उघडकीस आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले आहे.

यापूर्वीही त्यांना समाजरत्न, समाजगौरव
कवीरत्न असे विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. जिल्हाधिकारी सातारा, उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद, आधार बहुउद्देशीय संस्था अहमदनगर, लेक लाडकी अभियान, जिल्हा उद्योग केंद्र तसेच पोलीस अधीक्षक यांच्या हस्तेही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. गोरगरिबांचा

मसीहा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे
राजकुमार डोंबे यांनी आजवर ७५ पेक्षा अधिक प्रशासन दरबारी विविध प्रश्न आंदोलनांच्या माध्यमातून यशस्वीपणे मांडले आहेत. कोणतेही प्रकरण हातात घेतल्यावर त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून न्याय मिळवून देणे ही त्यांची खासियत आहे. कायद्याचे सखोल ज्ञान, उत्कृष्ट लेखनशैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी

याच्या जोरावर त्यांनी अनेक प्रकरणामध्ये यश मिळवले आहे
अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून भोंदू महाराज, बुवाबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. जीव धोक्यात घालून केलेल्या या कार्यामुळे हजारो लोकांना न्याय मिळाला आहे. त्यांच्या कार्याचे पुरावे त्यांनी व्यवस्थित जतन करून ठेवले आहेत.

जनसेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास घेऊन ते अविरतपणे कार्यरत आहेत. कोणताही राजकीय आधार न घेता, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारला आहे.

अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करून समाजात जागृती निर्माण केली आहे.  या सन्मानाबद्दल वर्षाताई देशपांडे, सहशाला जाधव, डॉ. कुमार सप्तर्षी, आप्पा अनारसे, सुदाम दगड, पंडित तुपे, युवराज मगदूम, सचिन पांडोले तसेच युक्रांतीच्या कार्यकत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. म्हसवडवासीयां कडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अशा धाडसी, झुंजार सामाजिक कार्यकर्त्याला उदंड आयुष्य लाभो, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ओळखल्या जाणार्या राजकुमार डोंबे यांनी आजवर अनेक समाजातील छोट्या – मोठ्या घटकांसाठी शासन दरबारी विविध आंदोलने केली आहेत, यापैकी हासुड, आंदोलन, बोंबाबोंब आंदोलन, मरीआई देऊळवाले समाजासाठीचे आंदोलन अशी आंदोलने आज ही येथील सर्वसामान्य जनतेच्या स्मरणात चांगलीच आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!