महसूल विभाग, तहसिल कार्यालय, शिरपूर जि. धुळे
दिनांक: १९ जुलै २०२६
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) मा. मुख्यमंत्री महोदयांच्या जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजीतदादा पवार यांच्या जयंती निमित्त शिरपूर येथे २२ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर’चे आयोजन
शिरपूर (धुळे):
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील भंडारी सभागृह शिरपूर येथे बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी भव्य ‘समाधान शिबीर’ चे आयोजन करण्यात आले आहे. मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजीतदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा थेट लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी तातडीने सोडवणे हा मुख्य उद्देश आहे.
अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रमुख सेवा व लाभ हे महसूल विभाग, ग्राम विकास विभाग,नगर विकास विभाग,आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, एम एस ई बी, कृषी विभाग, शिक्षण विभाग या सर्व विभागाच्या विविध योजनांचा लाभ शिरपूर तालुक्यातील लाभार्थींना दिला जाणार आहे
या शिबिराचे नियोजन धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से.), शिरपूर भागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक आणि शिरपूरचे तहसिलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. शिरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शेतकरी बांधवांनी आणि महिला भगिनींनी २२ जुलै रोजी आयोजित या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






















