Homeताज्या बातम्या‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; १४ ऑगस्टपर्यंत मुदत

‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; १४ ऑगस्टपर्यंत मुदत

ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सेवा गावपातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत स्तरांवर रिक्त असलेल्या सेवा केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रम्हपुरीच्या प्रांत अधिकारी पर्वणी पाटील आणि तहसीलदार सतीश मासाळ यांनी केले आहे.

या सेवा केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. निवड प्रक्रिया माहिती तंत्रज्ञान विषयक शासकीय धोरण, १९ जानेवारी २०१८, सामान्य प्रशासन विभागाच्या २७ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयासह इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकातील सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे.

‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या माध्यमातून नागरिकांना सातबारा, आठ-अ उतारा, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय सेवांचा लाभ मिळू शकणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जाण्याची गरज कमी होणार असून वेळ आणि पैशांची बचत होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हे सेवा केंद्र स्वयंरोजगाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते.

इच्छुक उमेदवारांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ असल्याने इच्छुकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध करून द्यावा; नगरसेवक मनोज भूपाल यांची ब्रम्हपुरी पालिकेकडे मागणी

0
ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख) राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय सण तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांना राष्ट्रध्वजाची आवश्यकता...

सिन्नरमध्ये तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ शाळांचा सहभाग

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :सिन्नर येथे सह्याद्री युवा मंच आणि सिन्नर तालुका शालेय क्रीडा आयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले....

जपतलाई आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश; तिघींचा मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

0
दौड:(प्रतिनिधी मयुर साळवे,संघराज गायकवाड)  गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना १० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेत तीन...

गेवराईच्या तहसीलदारपदी गीतांजली गरड रुजू; वाळू तस्करी आणि एजंटशाहीविरोधात कडक कारवाईचा इशारा

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  गेवराईच्या नव्या तहसीलदार म्हणून गीतांजली गरड यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. राक्षसभुवन येथील चर्चेत असलेल्या वाळू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाची जबाबदारी...

error: Content is protected !!