Homeताज्या बातम्यावाहनतळ नसल्याने नोकरदारांचे हाल — रामवाडी व वाघोली मेट्रो स्थानक परिसरातील नागरिकांचा...

वाहनतळ नसल्याने नोकरदारांचे हाल — रामवाडी व वाघोली मेट्रो स्थानक परिसरातील नागरिकांचा संताप…

पुणे: १३ जून: पुणे मेट्रोचा प्रवास सोयीस्कर आणि जलद असला तरी मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळ नसल्याने नोकरदार आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वाघोली, रामवाडी, खराडी, चंदननगर, विमाननगर आणि वडगाव शेरी परिसरातील नागरिकांना या समस्येचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

दररोज कामावर जाण्यासाठी अनेक नोकरदार मेट्रोचा वापर करत आहेत. मात्र स्थानकाजवळ वाहनतळ नसल्यामुळे त्यांना दुचाकी पदपथावर लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस पदपथावर उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत असून, वाहनधारकांना दरवेळी ७०० ते ८०० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

महिन्यातून दोन ते तीन वेळा तरी हा दंड भरावा लागतो, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. मेट्रोच्या सोयीमुळे वेळ आणि पैसे वाचतील, या अपेक्षेने नागरिक मेट्रोकडे वळले, मात्र वाहनतळाच्या सुविधेअभावी त्यांना वेगळ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

महापालिकेने अद्याप मेट्रो स्थानक परिसरात कोणतीही अधिकृत पार्किंग व्यवस्था केलेली नाही. उलट, ‘नो पार्किंग’चे फलक लावून वाहने हटवण्यात येत आहेत. वाहनतळाची कोणतीही सोय न करता अशाप्रकारे कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

मेट्रो सेवा सुरू करताना स्थानकाजवळ वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व मेट्रो स्थानकाजवळ तातडीने अधिकृत वाहनतळाची सोय करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तसेच, जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही, तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई न करता नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मेट्रो प्रवाशांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!