Homeताज्या बातम्याशरद पवारांची मोठी घोषणा : आगामी निवडणुकांबाबत स्पष्ट संकेत, नव्या नेतृत्वाला मिळणार...

शरद पवारांची मोठी घोषणा : आगामी निवडणुकांबाबत स्पष्ट संकेत, नव्या नेतृत्वाला मिळणार मोठी संधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून महत्त्वपूर्ण घोषणा केली. आगामी निवडणुकांबाबत स्पष्ट संकेत देत, त्यांनी नव्या पिढीला संधी देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच देशाच्या सुरक्षेपासून शेजारील देशांशी संबंधांपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.

नवीन नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा सन्मान

शरद पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे आणि मेहनतीमुळे पक्ष आज या टप्प्यावर पोहोचला आहे. निलेश लंके यांचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की, ‘रात्री १२ नंतरही लोकांशी भेटणं ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. असे कार्यकर्तेच पक्षाचा खरा आधार आहेत.'”

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या वक्तव्याचे समर्थन करत पवार म्हणाले, “जयंतरावांनी योग्यच म्हटले आहे की नव्या पिढीला संधी द्यायला हवी. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून, सामूहिक निर्णय घेतला पाहिजे.”

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇

प्रत्येक तालुक्यात नवीन चेहऱ्यांची गरज

पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रत्येक तालुका व जिल्ह्यात नवे चेहरे दिसले पाहिजेत. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, जेणेकरून राज्य चालवण्यास सक्षम नेतृत्व घडू शकेल.”

राष्ट्रहित व राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च

देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना पवार म्हणाले, “पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला, तेव्हा आम्ही सरकारवर टीका केली नाही. कारण देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणताही कठोर निर्णय घेतला जात असेल, तर त्याचं समर्थन करायला हवं. राष्ट्रहित हे सर्वोच्च आहे.”

शेजारील देशांशी सुसंवादाचा अभाव चिंताजनक

शेजारील देशांशी असलेल्या नातेसंबंधांवर चिंता व्यक्त करत पवार म्हणाले, “आज पाकिस्तान, बांगलादेश, चीन, श्रीलंका हे आपले मित्र राहिलेले नाहीत. या देशांशी संवादाची स्थिती सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली आहे. हे भविष्या साठी चिंताजनक आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

error: Content is protected !!