Homeताज्या बातम्याधायरीतील 'श्री ज्वेलर्स'चा सुवर्ण भिशी घोटाळा – ४२ लाखांची फसवणूक, २१ तोळे...

धायरीतील ‘श्री ज्वेलर्स’चा सुवर्ण भिशी घोटाळा – ४२ लाखांची फसवणूक, २१ तोळे सोन्यासह दहिवाळ दांपत्य फरार

पुणे / खडकवासला : सुवर्ण भिशी योजनेच्या आमिषाने
पुणे आकर्षक परताव्याच्या आमिषाने सुरू करण्यात आलेल्या सुवर्ण भिशी योजनेच्या नावाखाली धायरीतील ‘श्री ज्वेलर्स’ या सराफी दुकानाने तब्बल ३६ गुंतवणूकदारांची ४२ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन दुकानाचे मालक विष्णू सखाराम दहिवाळ आणि त्यांची पत्नी स्वाती दहिवाळ हे फरार झाले आहेत.

ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर नन्हे गावातील एका व्यावसायिकाने ९ जून रोजी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी *’श्री ज्वेलर्स’*चे मालक दहिवाळ दांपत्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा (MPID Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीची पद्धत

धायरी येथील रासकरमळा परिसरात ‘श्री ज्वेलर्स’ हे दहिवाळ दांपत्य चालवत होते. त्यांनी सुवर्ण भिशी योजना सुरू करून गुंतवणूकदारांना नियमित हप्त्यांत पैसे भरून नंतर सोने मिळण्याचे आमिष दाखवले. अनेकांनी या योजनेत गुंतवणूक केली. तक्रारदाराने आणि त्यांच्या पत्नीने ३.३९ लाख रुपयांची गुंतवणूक करून चार तोळ्यांचे गंठण मिळवण्याचा करार केला होता. यामध्ये एक जुना गंठण मोडून आलेली रक्कम, रोख पैसे आणि ऑनलाइन व्यवहार यांचा समावेश होता.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇
Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

मात्र, २५ मे रोजी दांपत्याने दुकान बंद केले आणि पसार झाल्याचे उघड झाले. यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिस तपासात नव्या बाबी उघड

पोलिस तपासात समोर आले की, दहिवाळ दांपत्याने एकूण ३६ गुंतवणूकदारांकडून ४२ लाख ७८ हजार रुपये आणि २१ तोळे सोने घेतले होते. पैसे किंवा दागिने परत न करता हे दोघं फरार झाले. सध्या पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस आणि गुन्हे विभागाचे निरीक्षक गुरूदत्त मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गुंतवणूकदारांना पोलिसांकडून आवाहन

या योजनेत फसवणूक झालेल्या इतर गुंतवणूकदारांनीही पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. योजनेचा बळी ठरलेल्यांनी पुरावे घेऊन नांदेड सिटी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!