Homeताज्या बातम्याआंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी सकारात्मक पावले; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तत्काळ निर्णयाचे आश्वासन

आंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी सकारात्मक पावले; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तत्काळ निर्णयाचे आश्वासन

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयासमोरील जागेवर उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासह राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या मागणीला मुख्य मंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाला दिले.

पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्तपणे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत सदर मागणीचे निवेदन सादर केले. ससून हॉस्पिटल समोरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक आणि आधुनिक सांस्कृतिक केंद्र उभारण्याबाबत मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट केले होते.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा शिष्टमंडळाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान स्मारकासाठी लागणाऱ्या जागेची निश्चिती, निधी, नियोजन व प्रशासकीय प्रक्रियेबाबत सकारात्मक चर्चा झाली. राज्य शासन या महत्त्वाच्या सांस्कृतिक प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहत असून बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य असा जागतिक दर्जाचा प्रकल्प उभारण्यात येईल, असेही आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी दिले.

यावेळी शिष्टमंडळामध्ये परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे आणि संजय सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर नेते उपस्थित होते.

हे शिष्टमंडळ सातत्याने शासनाकडे तसेच अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!