ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर नन्हे गावातील एका व्यावसायिकाने ९ जून रोजी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी *’श्री ज्वेलर्स’*चे मालक दहिवाळ दांपत्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा (MPID Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फसवणुकीची पद्धत
धायरी येथील रासकरमळा परिसरात ‘श्री ज्वेलर्स’ हे दहिवाळ दांपत्य चालवत होते. त्यांनी सुवर्ण भिशी योजना सुरू करून गुंतवणूकदारांना नियमित हप्त्यांत पैसे भरून नंतर सोने मिळण्याचे आमिष दाखवले. अनेकांनी या योजनेत गुंतवणूक केली. तक्रारदाराने आणि त्यांच्या पत्नीने ३.३९ लाख रुपयांची गुंतवणूक करून चार तोळ्यांचे गंठण मिळवण्याचा करार केला होता. यामध्ये एक जुना गंठण मोडून आलेली रक्कम, रोख पैसे आणि ऑनलाइन व्यवहार यांचा समावेश होता.
Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image below👆👆
मात्र, २५ मे रोजी दांपत्याने दुकान बंद केले आणि पसार झाल्याचे उघड झाले. यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिस तपासात नव्या बाबी उघड
पोलिस तपासात समोर आले की, दहिवाळ दांपत्याने एकूण ३६ गुंतवणूकदारांकडून ४२ लाख ७८ हजार रुपये आणि २१ तोळे सोने घेतले होते. पैसे किंवा दागिने परत न करता हे दोघं फरार झाले. सध्या पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस आणि गुन्हे विभागाचे निरीक्षक गुरूदत्त मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुंतवणूकदारांना पोलिसांकडून आवाहन
या योजनेत फसवणूक झालेल्या इतर गुंतवणूकदारांनीही पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. योजनेचा बळी ठरलेल्यांनी पुरावे घेऊन नांदेड सिटी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.























