Homeताज्या बातम्यापुण्यात 26 सप्टेंबरला विश्वचषकाची भव्य रॅली ; पुणेकरांना वर्ल्ड कपची ट्रॉफी पाहण्याची...

पुण्यात 26 सप्टेंबरला विश्वचषकाची भव्य रॅली ; पुणेकरांना वर्ल्ड कपची ट्रॉफी पाहण्याची पहिल्यांदाच संधी – रोहित पवार

पुण्यात 26 सप्टेंबरला विश्वचषकाची भव्य रॅली ; पुणेकरांना वर्ल्ड कपची ट्रॉफी पाहण्याची पहिल्यांदाच संधी…
पुणे – एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा करंडक सध्या भारताच्या विविध भागातून दौरा करत आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना त्याची झलक बघायला मिळत असून, मंगळवारी (ता. २६) पुणेकरांना हा करंडक बघण्याची संधी मिळणार आहे.
पुणेकरांना हा करंडक बघायला मिळावा यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भव्य रॅलीचे आयोजन केले असून, अशा पद्धतीने रॅली काढणारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना देशातील पहिलीच संघटना ठरेल, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“केवळ अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच करंडकासोबत फोटो काढण्याची संधी मिळते असा समज आहे. पण, आम्ही सर्व क्रिकेट चाहत्यांना विश्वचषक करंडकासोबत फोटो काढण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत. क्रिकेट चाहते ही संधी चुकवणार नाहीत.”, असा विश्वासही रोहित पवार यांनी या वेळी व्यक्त केला.

कशी असेल रॅलीचे रूट मॅप…
या रॅलीचे मंगळवारी (ता. २६) आयोजन करण्यात आले आहे. सेनापती बापट मार्गावरील जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलपासून दु. १२ वाजता या रॅलीची सुरुवात होईल. सेनापती बापट रस्त्याने कृषि महाविद्यालयार रॅलीची सांगता होईल. चाहत्यांना करंडकाची झलक बघायला मिळावी यासाठी रॅली सिम्बायोसिस महाविद्यालय, बीएमसीसी आणि फर्ग्युसन महाविद्यालय येथे काही काळ थांबविण्यात येणार आहे. 
तीन तास चालणाऱ्या या रॅलीमध्ये महाराष्ट्राचीसल आजी माजी खेळाडू, रणजीपटू आणि संघटनेचे अन्य भागधारक सहभागी होणार आहेत. विविध सायकलिंग क्लब, मोटरसायकल रायडर्स गट आणि मॅरेथॉन धावकांना रॅलित सहभागी होण्याचे आवाहन या वेळी रोहित पवार यांनी केले.
आम्ही ढोल-ताशाच्या निनादात खास महाराष्ट्रीय पद्धतीने करंडकाचे स्वागत करू असेही पवार म्हणाले.
सर्व सामान्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सर्वाधिक तिकिटे उपलब्ध करून दिली असून, असा निर्णय घेणारी देखिल महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही देशातील एकमेव संघटना आहे. रहदारी आणि पार्किंगचा प्रश्न निकालात काढण्यात आला असून, यासाठी स्टेडियमच्या आजूबाजूची ६ एकर जागा खरेदी करण्यात आल्याची माहितीही पवार यांनी या वेळी दिली.
पत्रकार परिषदेस संघटनेचे सचिव शुभेंद्र भांडारकर, सर्वोच्च परिषदेचे सदस्य सुहास पटवर्धन, सुनिल मुथा, सुशिल शेवाळे, एमसीएचे सीओओ अजिंक्य जोशी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!