Times of Maharashtra desk, Abhishek Filmfare controversy: अभिनेता अभिषेक बच्चनला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
त्याच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत त्याला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला असून, आय वॉक टू टॉक या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. परंतु यावर एका युजर ने सोशल मीडियावर “हा पुरस्कार जिंकला नसून खरेदी केला आहे” असा आरोप केला आहे. या आरोपावर अभिनेत्याने उत्तर दिले असून अभिनेत्याची ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
नक्की काय म्हणालं सोशल मिडिया युजर
अभिषेक अभिनेता म्हणून कितीही मैत्रीपूर्ण असला तरी त्याने एका पुरस्कारासाठी कसे पैसे दिले आणि वाईट जनसंपर्क वापरून स्वतःला कशाप्रकारे उत्तम दाखवण्याचा प्रयत्न केला, याचं उदाहरण या पुरस्कारामुळे समोर आलं आहे. संपूर्ण करिअरमध्ये एकही सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट नसला तरी अभिषेकला यावर्षी ‘आय वाँट टू टॉक’साठी पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट काही मोजक्या पैसे मिळालेल्या समीक्षकांशिवाय कोणीही पाहिलेला नाही. आता अचानक मला असे ट्विट्स दिसत आहे, ज्यात 2025 हे अभिषेकचं वर्ष असल्याचा दावा केला जात आहे. हे सर्व खूपच मजेशीर आहे. त्याच्यापेक्षा बरेच चांगले कलाकार आहेत, जे खरंच पुरस्कारांसाठी पात्र आहेत. पण दुर्देवाने त्यांच्याकडे जनसंपर्काचा जाणकार किंवा पैसाही नाही”,
या वर काय म्हणाला अभिनेता?
युजर ने अभिषेक वर असा आरोप करताच अभिनेत्याने ही युजर ला चांगलेच उत्तर दिले आहे . त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील पोस्टमध्ये त्या युजरला सडेतोड उत्तर दिले आहे . अभिनेता म्हणाला ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी कधीही कोणतेही पुरस्कार खरेदी केलेले नाहीत किंवा मी कधीही भरभरून पीआर केलेलं नाही. मी जे काही केलं, ते कठोर परिश्रम करून, घाम गाळून आणि अश्रू वाहून केलं आहे. पण मी जे काही बोलतोय किंवा लिहितोय त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिक मेहनत करणं. जेणेकरून तुम्हाला भविष्यातील माझ्या कोणत्याही कामगिरीवर कधीही शंका उपस्थित होणार नाही. मी तुम्हाला चुकीचं सिद्ध करेन आणि तेसुद्धा अत्यंत आदरपूर्वक मार्गाने.’
अभिषेक च्या या उत्तरानंतर अभिषेक च्या चाहत्यांनी अभिषेक च्या कामाचे कौतुक करत. सोशल मीडियावर अभिनेत्याला पाठींबा दिला आहे.























Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!