Times of Maharashtra News Desk : नेरूळ येथील एसआयईएस (SIES) महाविद्यालयात ‘अद्वैत २०२५-२६’ या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा उत्सव येत्या २३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, नवकल्पनांना आणि कलागुणांना व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम यंदा अधिक ऊर्जा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसह साजरा होणार आहे.
या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘फिनटँक’, ही वित्तीय संकल्पनांवरील स्पर्धा असून, विद्यार्थ्यांना आपल्या अब्जावधींच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. व्यवसाय, अर्थकारण आणि स्टार्टअप क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खास ठरणार आहे.
तसेच, ‘स्पॉटलाईट’ या आंतरमहाविद्यालयीन टॅलेंट हंटमध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आपली कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकणार आहेत. नृत्य, गायन, अभिनय अशा विविध कलाप्रकारांचा रंगमंच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
खेळ आणि साहसाची आवड असणाऱ्यांसाठी लाईफ-साइज स्नेक्स अँड लॅडर्स, एस्केप रूम्स, तसेच कॅम्पस ट्रेझर हंट यांसारखे रोमांचक खेळही आयोजित करण्यात आले आहेत.
मोठी बक्षिसे, उत्साही वातावरण आणि तरुणाईचा जोश अनुभवण्यासाठी ‘अद्वैत २०२५-२६’ हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






















