Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका बारामती- दौंडमध्ये राष्ट्रवादीत तणाव, इतर ठिकाणी एकत्र लढत

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका बारामती- दौंडमध्ये राष्ट्रवादीत तणाव, इतर ठिकाणी एकत्र लढत

Times of Maharashtra Desk : महापालिका निवडणुकांनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी बहुतांश ठिकाणी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी फायद्याचं ठरेल त्या ठिकाणी ‘घड्याळ’ तर काही ठिकाणी ‘तुतारी’ या चिन्हावर उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील बारामती आणि दौंड या दोन महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये शरद पवारांच्या गटाला एकही जागा न मिळाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

बारामती-दौंडमध्ये जागावाटपावरून मतभेद

बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या सहा जागांची मागणी शरद पवारांच्या गटाने केली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकही जागा देण्यास नकार दिल्याने नाराजी वाढली आहे. दौंड तालुक्यातही अशीच परिस्थिती असून, दोन्ही निवडणुकांमध्ये अजित पवार गटाचेच उमेदवार मैदानात असणार आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

स्थानिक नेत्यांकडून आम्ही अजितदादांसोबतच राहू असं जरी जाहीरपणे सांगितलं जात असलं, तरी कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दौंडमध्ये तर शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करून थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय काही कार्यकर्ते अपक्ष उमेदवारीच्या तयारीत असल्याचंही समजतंय.

इंदापूर–पुरंदरमध्ये समन्वय

इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये मात्र शरद पवारांच्या गटाला समाधानकारक जागा देण्यात आल्याने या भागात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

जुन्नरमध्ये ‘घड्याळ’ वर एकत्र लढत

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकाच ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार आहेत. या उमेदवारांची जबाबदारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर देण्यात आली आहे. जुन्नरमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचं आव्हान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

आंबेगावात थेट लढत

दरम्यान, आंबेगाव तालुक्यात तुतारी विरुद्ध घड्याळ अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष अधिक उघड होण्याची शक्यता आहे.

एकूणच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचं चित्र असलं तरी बारामती, दौंड आणि आंबेगावसारख्या ठिकाणी अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीमुळे राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!