Homeआरोग्यअजित पवारांचा मृत्यू अपघात की घातपात? रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर आणि...

अजित पवारांचा मृत्यू अपघात की घातपात? रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर आणि धक्कादायक प्रश्न

Times of Maharashtra Desk : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच या घटनेभोवती संशयाचे ढग अधिक गडद होत चालले आहेत. अपघात की घातपात, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात एकामागोमाग एक गंभीर प्रश्न उपस्थित करत संपूर्ण घटनाक्रमावर संशय व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी थेट आरोप न करता अनेक मुद्द्यांवर बोट ठेवत, हे सगळं नियोजनबद्ध होतं का? असा थेट सवाल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार हे नेहमी कारने प्रवास करणारे नेते होते. मात्र अपघाताच्या आदल्या दिवशी अचानक त्यांचा प्रवासाचा प्लॅन बदलून विमानाने जाण्याचा निर्णय कसा आणि का घेण्यात आला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

कारने जाण्याचा प्लॅन बदलला कसा?

रोहित पवार यांचा दावा आहे की, अजित पवार यांचा मूळ प्रवास कारनेच होणार होता. मात्र आदल्या रात्री काही कारणे पुढे करून त्यांना मुंबईत जाणीवपूर्वक अडवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत त्यांनी विमानाने प्रवास करावा, यासाठी कुणीतरी प्रयत्न केले का, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय, विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी बदलण्यात आले, ही बाबही संशयास्पद असल्याचं रोहित पवारांनी नमूद केलं. पायलट बदलण्यामागचं नेमकं कारण काय, कोणाच्या आदेशावर हा बदल झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

मेंटेनन्स आणि तांत्रिक बाबींवर संशय

अपघातग्रस्त लेअरजेट विमान हे VSR कंपनीचे असल्याची माहिती समोर आली आहे. या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं? एअरवर्थीनेस रिपोर्ट, टेकलॉग, रुटीन मेंटेनन्स आणि हेव्ही बेस मेंटेनन्सचे अहवाल अद्याप सार्वजनिक का करण्यात आले नाहीत, असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, १३-१४ दिवस उलटूनही तपास यंत्रणांकडून ठोस प्रगती दिसत नाही. फक्त सीसीटीव्ही फुटेज गोळा करून प्रकरण थंड बस्त्यात टाकलं जातंय का?

मेडे कॉल, ट्रान्सपाँडर आणि गो-अराऊंडचा प्रश्न

अपघाताच्या वेळी पायलटने मेडे कॉल का दिला नाही?
विमानाचा ट्रान्सपाँडर बंद का होता?
विमान खाली येताना दुसरा गो-अराऊंड का घेतला गेला नाही?

हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचं रोहित पवार म्हणाले. काही तज्ज्ञांच्या मते विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम आणि EGPWS अलर्ट कार्यरत नव्हते, त्यामुळे पायलटला धोक्याची पूर्वकल्पना मिळाली नाही. मात्र ही यंत्रणा बंद होती की निष्क्रिय होती, याबाबतही कोणताही अधिकृत अहवाल समोर आलेला नाही.

मोसादचा दाखला आणि घातपाताचा संशय

रोहित पवार यांनी या प्रकरणात इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेवर आधारित एका पुस्तकाचा दाखला देत धक्कादायक विधान केलं. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला संपवायचं असेल, तर थेट त्याच्यावर नाही, तर त्याच्या प्रवास व्यवस्थेवर घाला घातला जातो, असा उल्लेख त्यांनी केला.
अजित पवारांच्या बाबतीत असाच काही प्रकार घडला का, याची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

विदर्भातील नेत्याची ‘फाईल’ आणि संशयास्पद विलंब

रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याने अजित पवारांकडे एका महत्त्वाच्या फाईलवर सही करण्यासाठी आग्रह धरला. ही फाईल घरी असल्याने ती आणण्यासाठी वेळ गेला. त्याच दिवशी पक्षातीलच एका मोठ्या नेत्याची भेट उशिराने झाल्यामुळे संपूर्ण वेळापत्रक बिघडलं आणि अखेर दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.
“हा सगळा विलंब योगायोग होता की नियोजन?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्लॅस्टिक बाटली बंद करण्यामागचं गूढ

रोहित पवार यांनी अजित पवारांच्या वैयक्तिक सवयींवरही प्रकाश टाकला. काही दिवसांपासून त्यांनी प्लॅस्टिक बाटली वापरणं थांबवून काचेच्या बाटलीतूनच पाणी प्यायला सुरुवात केली होती. ती बाटली कायम त्यांच्या विश्वासू सुरक्षारक्षकाकडे असायची.
त्यांना आधीच काही धोका जाणवत होता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अपघाताचा नेमका घटनाक्रम

अजित पवार हे २८ जानेवारी रोजी सकाळी ७.५० वाजता विमानतळावर पोहोचले. ८.१० वाजता विमानाने उड्डाण केलं. ८.२२ वाजता विमान लोणावळा परिसरात होतं. ८.४३ ते ८.४५ दरम्यान अपघात झाला.
९ वाजता ते गंभीर असल्याची माहिती मिळाली आणि ९.४५ वाजता त्यांच्या निधनाची बातमी आली.

हे विमान १६ वर्षे जुने असून, त्याच्या आधी दोन दिवस ते सुरतला जाऊन आलं होतं. कंपनीने धुक्यामुळे अपघात झाल्याचा दावा केला असला, तरी अपघातस्थळी विमान कलत खाली आल्याचं आणि नंतर स्फोट झाल्याचं स्पष्ट दिसतं, असा दावा करण्यात येतोय.

VSR कंपनीवर गंभीर आरोप

या कंपनीच्या विमानावर युरोपमध्ये बंदी असल्याचा दावा करण्यात येतो.
याच कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता, मात्र त्याचा तपास अहवाल आजतागायत समोर आलेला नाही.
वैमानिकांवर १२ तासांच्या विश्रांतीचा नियम असतानाही सहा तासांतच उड्डाणासाठी दबाव टाकला जात होता, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर बंद ठेवला जात होता, अशी माहितीही पुढे आली आहे.

स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपासाची मागणी

या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भारतातील तपास यंत्रणांसोबतच फ्रान्स किंवा अमेरिकेच्या स्वतंत्र तपास संस्थेमार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.
खर्च वाचवण्यासाठी अतिरिक्त इंधन नेलं जात असेल, तर ते विमानासाठी बॉम्बसारखं आहे, असा गंभीर आरोप करत VSR कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

अपघातानंतरही राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री याच कंपनीच्या विमानातून प्रवास करत असल्याने हा प्रकार अधिक गंभीर असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली (तासगांव) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार...

दौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे  भीम महोत्सव २०२६ ...

पुण्याच्या डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांची ISAR च्या 16व्या अध्यक्षपदी नियुक्ती; भारतातील फलनक्षमता उपचार क्षेत्राला...

0
Times Of Maharashtra Desk : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फलनक्षमता तज्ज्ञ आणि रुबी हॉल आयव्हीएफ एंडोस्कोपी सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांनी आता इंडियन...

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

error: Content is protected !!