Homeताज्या बातम्याभाजपकडून बंडखोरांवर कठोर कारवाई; ६९ कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित.

भाजपकडून बंडखोरांवर कठोर कारवाई; ६९ कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित.

Times Of Maharashtra Desk:राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर भाजपने पक्षशिस्त भंग करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या शहरातील तब्बल ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.ही कारवाई भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, यासंदर्भातील अधिकृत पत्रही समोर आले आहे. पत्रावर प्रदेशाध्यक्षांची स्वाक्षरी असून निलंबित करण्यात आलेल्या सर्व ६९ जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे कारवाई

पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे हा पक्षशिस्तीचा गंभीर भंग असल्याचे नमूद करत संबंधित कार्यकर्त्यांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत त्यांना पक्षातील कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. असा ठाम संदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. तसेच भविष्यात कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी केली आहे.

तात्काळ अंमलबजावणी

सदर कारवाई तात्काळ लागू करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक शिस्त अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, पुढील राजकीय घडामोडींवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या ६९ जणांची नावे पुढीलप्रमाणे:
  1. श्री धनंजय जाधव

  2. श्री चंद्रकांत पाटे

  3. सौ. कादंबरी साळवी

  4. श्री जितेंद्र टकले

  5. श्री किशोर तरवडे

  6. श्री अमोल बालवडकर

  7. श्री सोमनाथ गुंड

  8. सौ. मानसी सोमनाथ गुंड

  9. सौ. अनिता तळाठी

  10. सौ. पल्लवी गाडगीळ

  11. श्री दत्ता भगत

  12. श्री विनोद मोहिते

  13. श्री रमेश भंडारी

  14. श्री समाधान शिंदे

  15. श्री मधुकर मुसळे

  16. श्री प्रकाश डोरे

  17. श्री बाळासाहेब सानवडे

  18. सौ. मंजू वाघमारे

  19. सौ. प्रीती वालकर

  20. श्री संदीप लोणकर

  21. सौ. स्मिता गायकवाड

  22. श्री संतोष शिंदे

  23. श्री युवराज कुञ्जेकर

  24. श्री इफ्तियाज मोमीन

  25. श्री अप्पणा दादावाडकर

  26. श्री पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर

  27. अभिजीत उपाध्ये

  28. सौ. छाया गवळी

  29. श्री नवल कुसाळ

  30. श्री समीर पठाण

  31. श्री प्रणव मोरे

  32. श्री योगेश सूर्यवंशी

  33. सौ. अर्चना योगेश सूर्यवंशी

  34. सौ. नलिनी मोरे

  35. सौ. संगिता ठोसर

  36. श्री अनिल मेमाणे

  37. श्री नितीन मारकड

  38. श्री सतीश मारकड

  39. सौ. वर्षा मारकड

  40. श्री रुपेश धुले

  41. श्री बापू पोकळे

  42. श्री किरण वाळुंज

  43. श्री अमोल रायकर

  44. श्री संदीप पोकळे

  45. मोहिनी देवकर

  46. रितेश रासकर

  47. सचिन दशरथ दांगट

  48. सुरेंद्र कांबळे

  49. श्री संदीप जन्हाड

  50. सौ. सुनीता गलांडे

  51. श्री किशोर वाघमारे

  52. श्री विजय चौगुले

  53. श्री अकबर पठाण

  54. श्री राजू साखरे

  55. सौ. ऐश्वर्या जाधव

  56. श्री जितेंद्र जगताप

  57. श्री प्रविण खेडकर

  58. सौ. स्मिता खेडकर

  59. सौ. उज्वला गोडे

  60. श्री बाळासाहेब घोडके

  61. श्री सुरेश धनगर

  62. सौ. स्वाती धनगर

  63. सौ. सुवर्णा भरेकर

  64. सौ. पल्लवी केदारी

  65. श्री राहुल रामे

  66. श्री हरीष परदेशी

  67. श्री बंडू जाधव

  68. सौ. नीता थोरवे

  69. श्री प्रीतम नागापुरे

    या कारवाईमुळे पक्षातील शिस्तीबाबत भाजपने स्पष्ट आणि कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!