Homeताज्या बातम्याJalana Political Update: "जालन्यात अजित पवारांचा रागाचा धडाका; उमेदवारासाठी खुर्ची लावण्याचे आदेश"

Jalana Political Update: “जालन्यात अजित पवारांचा रागाचा धडाका; उमेदवारासाठी खुर्ची लावण्याचे आदेश”

Times of Maharashtra Desk, Jalana Political Update:  जालन्यात राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. विविध भागात प्रचारांची सुरवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातून एक घटना समोर आली आहे. जालन्यामध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आणि थेट माइक हातात घेत कार्यकर्ते आणि पोलिसांची शाळा घेतली अशी माहिती समोर आली आहे आहे.

अजित पवार संतप्त.
जालन्यातील एका कार्यक्रमा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर बसले होते. त्या कार्यक्रमात त्यांच्या उमेदवाराला आणि कार्यकर्त्यांना खुर्च्या ठेवण्यात आल्या नव्हत्या. त्यांच्या उमेदवाराची खुर्ची खाली लावण्यात आली होती ह्या गोष्टीवर अजित दादा चिडले. ते अचानक उठले आणि माईक हातात घेत मला पोलिसांना आणि सगळ्यांना सांगायचं आहे. माझे जे उमेदवार आहेत, त्यांच्या खुर्च्या इथे समोर व्यासपीठासमोर लावा. मी सांगतो आहे, घ्या त्या खुर्च्या आणि समोर लावा. काढा त्या खुर्च्या कार्यकर्त्यांनो उठा. असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी कार्यक्रम नियोजकाला आणि पोलिसाना चांगलीच खरी- खोटी सुनावली आहे. अजित दादांच्या या कृतीने कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी अंदर वाढला आहे.

मी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने पुढे गेलेला कार्यकर्ता आहे. मी काम करतो,म्हणून निवडून येतो – अजित पवार

कार्यक्रमात भाषणाच्या वेळी अजित पवारांनी त्यांच्या या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. याच वेळी ते म्हणाले देश कोणाच्या हातात द्यायचा हा निर्णय देशातील मतदार घेतो, स्थानिक निवडणूका या जातीपातीच्या नावाने होत नाहीत. मी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने पुढे गेलेला कार्यकर्ता आहे. मी काम करतो, आणि म्हणून मी निवडून देखील येतो. बारामतीत मी ८ वेळा निवडून आलो आहे. काल बारामतीमध्ये 8 लोक बिनविरोध निवडून आले खर तर 10 आली असते. पण तीन वाजून गेले,आज राज्याचं अर्थकारण मी बघतो राज्याची तिजोरी माझ्याकडे आहे, नुसते नियोजन करून विकास करणे चालत नाही, तो सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे असे माझे मत आहे. आणि मी त्या साठीच प्रयत्न करतो . माझ्यासोबत काम करणार प्रत्येक कार्यकर्ता माझ्यासाठी सारखाच आहे. त्यांना समान ज्ञाय मिळायला हवा. म्हणून मी संतप्त झालो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!