Homeताज्या बातम्याBacchu Kadu Police Case : आंदोलन संपताच बच्चू कडूनसह आंदोलकांवर गुन्हा दाखल...

Bacchu Kadu Police Case : आंदोलन संपताच बच्चू कडूनसह आंदोलकांवर गुन्हा दाखल…

Times of Maharashtra desk, Bacchu Kadu Police Case : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे आशा अनेक मागण्यांसाठी सोमवार २७ ऑक्टोबर पासून अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकाऱ्यांचा विराट मोर्चा सुरू होता. यावर सरकार 30 जून पर्यंत निर्णय घेईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे यामुळे बच्चू कडूंच्या आंदोलना थोड्या प्रमाण यश मिळाले आहे असे म्हणता येईल पण आंदोलन मागे घेताच बच्चू कडूंवर कारवाई करण्यात आली आहे. आंदोलना दरम्यान नागरिकांना झालेल्या त्रासामुळे बच्चू कडूसह आंदोलकांवर नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका गुन्हा काय ? आणि कोणा कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला ?
बेकायदेशीरपणे महामार्ग अडविले, नागरिकांची गैरसोय झाली यासाठी नागपूर पोलिसांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी आंदोलकांना
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्चजवळील मोकळ्या जागेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी त्याच्या दोन किमी अलीकडेच वर्धा मार्ग अडविला आणि जवळपास 30 तासांहून अधिक वेळ संपूर्ण महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर आंदोलक तेथून हटल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अटींचे उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे जमून नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे आणि वाहतुकीत अडथळा आणणे यासारख्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बच्चू कडूंच्या महालाची कसून चौकशी करा…
भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत बच्चू कडूंच्या महालाची कसून चौकशी करा अशी मागणी केली आहे. गरिबांच्या जमिनी लुटून त्यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. यावर अद्यापही बच्चू कडू यांनी काही उत्तर दिले नसून बच्चू कडू यावर काय भाष्य करणार याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

error: Content is protected !!