Times of Maharashtra desk, Women’s World Cup 2025: भारताच्या महिला क्रिकेट टीम ने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. जेमिमा रॉड्रीग्ज व हरमनप्रीत कौरच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला असून संपूर्ण भारतभर जल्लोषाचे वातावरण आहे. आता टीम इंडिया महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल फेरीत पोहोचली आहे. सेमीफायनल फेरीत ऑस्ट्रेलियावर मात करत महिला टीमने हा विजय मिळवला आहे.
भारताकडून जेमिमा रॉड्रीग्जने उत्कृष्ट खेळी केली, जेमिमाने नाबाद १२७ धावा करून भारताला ३३९ धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यास मदत केली. महिलांच्या एकदिवसीय इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग होता. त्या सोबतच कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर जेमिमा, हरमनप्रीतसह संपूर्ण संघाचा आनंद गगनात मावेनासा आहे. भारताची महिला टीम तब्बल 8 वर्षांनी फायनला पोहचली आहे. सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी निवडून 338 इतकी मोठी धावसंख्या भारतापुढे ठेवली होती. भारताने आपली खेळण्यातील कसब दाखवत 5 क्रिकेटच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला आहे.
महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (IND vs SA Final) खेळला जाणार आहे. हा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्या साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या वर्षीच्या महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला भरीव बक्षीस रक्कम देऊन विजेत्या संघाचा सन्मान करणार आहे.






















