Homeटेक्नॉलॉजीभारत टॅक्सी अ‍ॅपची एंट्री; राइड-हेलिंग क्षेत्रात नवा सहकारी पर्याय

भारत टॅक्सी अ‍ॅपची एंट्री; राइड-हेलिंग क्षेत्रात नवा सहकारी पर्याय

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारताच्या राइड-हेलिंग क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल घडून आला आहे. केंद्र सरकारच्या सहकारिता मंत्रालयाच्या पुढाकारातून राजधानी दिल्लीत ‘भारत टॅक्सी’ या नव्या अ‍ॅपचे अधिकृत लाँचिंग करण्यात आले आहे. ही देशातील पहिली ड्रायव्हर-ओन्ड को-ऑपरेटिव्ह कॅब सेवा असून, सरकारच्या पाठबळाने सुरू झालेली ही सेवा ओला आणि उबरसारख्या खासगी अ‍ॅग्रीगेटर्सना पर्याय म्हणून पाहिली जात आहे.

केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह यांनी यापूर्वी केलेल्या घोषणेनुसार २ जानेवारी रोजी भारत टॅक्सी अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. या नव्या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश कॅब चालकांना पारदर्शक भाडे, अधिक कमाई आणि सुरक्षित रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेमार्फत चालवण्यात येणारे हे अ‍ॅप चालकांना संपूर्ण भाडे देण्याचे आश्वासन देते, तर प्रवाशांना निश्चित दरात सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याचा दावा करण्यात आला आहे.
इतर राइड-हेलिंग अ‍ॅप्सपेक्षा वेगळेपण जपत, भारत टॅक्सी सहकारी मालकी मॉडेलवर आधारित आहे. या उपक्रमाला अमूल, इफ्को (IFFCO) आणि नाबार्ड यांसारख्या नामांकित सहकारी संस्थांचा पाठिंबा लाभला आहे. सरकार थेट दैनंदिन कामकाजात सहभागी नसले तरी या योजनेचा प्रमुख प्रवर्तक म्हणून भूमिका बजावत आहे. या नव्या रचनेत कॅब चालक केवळ सेवा पुरवठादार नसून, तेच या व्यवस्थेचे भागधारक (स्टेकहोल्डर्स) आहेत.

दिल्लीसह इतर महानगरांत विस्ताराची तयारी
दिल्लीमध्ये सुरुवात झाल्यानंतर लवकरच मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख महानगरांमध्ये भारत टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना आहे. अहवालानुसार, गुजरातच्या काही भागांत आधीच ट्रायल रन आणि प्रारंभिक चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
विशेष म्हणजे, अधिकृत लाँचिंगपूर्वीच या प्लॅटफॉर्मला कॅब चालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, घोषणेनंतर अल्पावधीतच ५१ हजारांहून अधिक ड्रायव्हर्सनी नोंदणी केली आहे. त्यामुळे भारत टॅक्सी अ‍ॅप भविष्यात राइड-हेलिंग क्षेत्रातील चित्र बदलू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!