Homeमहाराष्ट्रसात वर्षांची समाजसेवा ठरली निर्णायक; लातूरच्या प्रभाग १३ मधून बाबा मोमीन रिंगणात

सात वर्षांची समाजसेवा ठरली निर्णायक; लातूरच्या प्रभाग १३ मधून बाबा मोमीन रिंगणात

Times of Maharashtra : लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ने नगरसेवक पदासाठी सर्वसामान्य कुटुंबातील बाबा रफीक मोमीन यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. रोज हप्त्यांवर भांडी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बाबा मोमीन गेल्या सात वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.

बाबा रफीक मोमीन यांनी प्रभागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गल्लीतील नाल्या, रस्त्यांची दुरवस्था, पथदिव्यांचा प्रश्न, स्वच्छतेचा अभाव अशा मूलभूत समस्यांवर त्यांनी केवळ तक्रारी न करता प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.

कोरोना काळातही त्यांनी समाजसेवेची जबाबदारी खांद्यावर घेतली. स्वखर्चातून क्वारंटाईन घरांमध्ये तसेच संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यासोबतच नागरिकांसाठी कोरोना लसीकरण शिबिरांचे आयोजन करून अनेक गरजू नागरिकांना लस उपलब्ध करून दिली.

प्रभागात वारंवार निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येमुळे डासांचे प्रमाण वाढून आजार पसरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः फवारणी यंत्र खरेदी करून नियमित फवारणी सुरू केली. तसेच ११ केव्हीची विद्युत वाहिनी सुमारे २०० घरांच्या वरून जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या गंभीर मुद्द्यावर त्यांनी स्थानिक नागरिकांना एकत्र करून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर ही विद्युत लाईन दुसऱ्या मार्गाने हलवण्यात यश मिळवले.

मी सर्वसामान्य घरातून आलो असून जनतेच्या विश्वासावरच ही निवडणूक लढवत आहे. आतापर्यंत केलेल्या कामाच्या बळावर आणि नागरिकांच्या पाठिंब्याने निवडणूक जिंकून प्रभागाच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा माझा निर्धार आहे, असा विश्वास बाबा रफीक मोमीन यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून उमेदवारी जाहीर झाल्याने लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!