Homeआरोग्यब्रह्मपुरीत रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या; १५ लाखांच्या मुद्देमालासह ३ ट्रॅक्टर जप्त!

ब्रह्मपुरीत रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या; १५ लाखांच्या मुद्देमालासह ३ ट्रॅक्टर जप्त!

 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ब्रह्मपुरी तालुक्यातील चिकलधोकडा-अ-हेररनवरगाव परिसरातील वैनगंगा नदीपात्रातून विनापरवाना रेतीची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अ-हेर-नवरगाव येथील विकास विद्यालय परिसरात अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती ‘ ११२’ वर प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली. वैनगंगा नदीपात्रातून चोरून आणलेली ३ ब्रास रेती आणि तीन ट्रॅक्टर-ट्रॉली पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

या प्रकरणी चालक कृष्णकांत गोवर्धन देवढगले (२६, भालेश्वर), विलास विखार (ब्रह्मपुरी), यश प्रभू बांडे (२०, नांदगाव जानी), मोंटू सहारे (नांदगाव जानी), साहिल कृष्णलाल बर्डे (२१, नांदगाव जानी) आणि कृष्णलाल सहारे (नांदगाव जानी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासनाचा महसूल बुडवून स्वतःच्या फायद्यासाठी रेतीची चोरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांच्या तक्रारीवरून करण्यात आली असून, सहायक फौजदार सुदेश कुंभरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बालाजी चव्हाण आणि सहाय्यक फौजदार सुदेश कुंभरे यांनी केली. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले असून, अवैध उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण पिसे करत आहेत. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!